पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात कोळी याने खडतर सात समुद्रांच्या आव्हानांपैकी सातवे आव्हान न्यूझीलंड येथील कूक स्ट्राईट खाडी नुकतीच पोहून पार केली. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 10) प्रभातचा सत्कार केला.
या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाऊशेठ पाटील, वसंत पाटील, सुधीर ठाकूर, किशोर पाटील आदी उपस्थित होते.
सात समुद्रांचे आव्हान पूर्ण करणार्या जगातील 21 जलतरणपटूंमध्ये प्रभात कोळीचा समावेश झाला असून अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वांत तरुण जलतरणपटू ठरला आहे.
प्रभातच्या यशात रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा सिंहाचा वाटा आहे. प्रभातने याच ठिकाणी सराव करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशाला गवसणी घातली. याकरिता लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वेळोवेळी पाठबळही लाभले असल्याचे या वेळी प्रभातचे वडील राजू कोळी यांनी सांगितले, तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रभातचे अभिनंदन व कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper