Breaking News

स्व. जनार्दन भगत यांच्या कार्याची स्फूर्ती वर्षभर जतन करा

  • लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन
  • स्व. भगतसाहेबांची पुण्यतिथी साधेपणाने साजरी

पनवेल ः प्रतिनिधी
स्व. जनार्दन भगत यांच्या जन्मदिनी आणि आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या कार्यापासून स्फूर्ती घेऊन ती वर्षभर म्हणजेच 365 दिवस जतन करा, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 7) स्व. जनार्दन भगत यांच्या 32व्या पुण्यतिथीनिमित्त केले. स्व. जनार्दन भगत यांच्या 32व्या पुण्यतिथीनिमित्त झूम अ‍ॅपचा वापर करून ऑनलाइन पध्दतीने एकाच वेळी अनेकांनी त्यांना अभिवादन केले.
कष्टकर्‍यांचे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची 32वी पुण्यतिथी गुरुवारी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  सामाजिक अंतराचे नियम पाळून साजरी करण्यात आली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी स्व. जनार्दन भगत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, वर्षाताई ठाकूर, अर्चना ठाकूर, अमोघ ठाकूर, भाजपचे प्रवक्ते वाय. टी. देशमुख आदी उपस्थित होते, तर ऑनलाइनद्वारे शेलघरहून अध्यक्ष अरुणशेठ भगत, संजय भगत, सीकेटी नवीन पनवेलहून डॉ. एस. टी. गडदे, इंदुताई घरत, संतोष चव्हाण, उज्ज्वला कोटीयन, खांदा कॉलनी येथून डॉ. व्ही. डी. बर्‍हाटे, आर. टी. पी. एस. खारघर राज अलोनी, अनिता मिश्रा, आर. टी. सी. सी. एस. खारघर एस. डी. शहा, के. के. म्हात्रे, एसबीसीटी लॉ कॉलेज खांदा कॉलनी डॉ. शितला गावंड, द्रोणगिरी अनुराधा काठे आणि नम्रता न्यूटन या गव्हाण येथून सहभागी झाल्या होत्या.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची जयंती यावर्षी आपण मोठ्या उत्साहात साजरी केली. त्यांच्या कार्याचे स्मरण कायम राहावे यासाठी थोर विचारवंत आणि चळवळींचे महामेरू असलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना स्व. भगतसाहेबांच्या नावाने पुरस्कार देऊन राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते  डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गौरवण्यात आले. या वेळी पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी उपस्थित होते, पण त्यांची पुण्यतिथी मात्र कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने कमीत कमी उपस्थितीत होत आहोत
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य अखंडपणे सुरू आहे. संस्थेच्या शाखांमध्ये दरवर्षी होणारी वाढ हे त्याचे निदर्शक आहे. संस्थेने लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला पाहायला मिळत आहे. 2018  मध्ये शासनाने सीकेटी महाविद्यालयाला स्वायत्त विद्यापीठ म्हणून मान्यता दिली.  राष्ट्रीय स्तरावरील ’एज्युकेशन वर्ल्ड’ या मासिकाने एप्रिल 2020च्या विशेषांकामध्ये 2020-21 या शैक्षणिक वर्षातील भारतातील खासगी स्वायत्त महाविद्यालयांमध्ये अव्वल स्थान मिळवलेल्या महाविद्यालयांच्या यादीमध्ये पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर स्वायत्त कॉलेज या महाविद्यालयाचा समावेश केला आहे. त्यामुळे संस्थेच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला. सीकेटी कॉलेजला राष्ट्रीय स्तरावरील 69वे आणि राज्य स्तरावरील 21 क्रमांकाचे रँकिंग मिळाले आहे. अत्यंत अल्पावधीत चांगू काना ठाकूर कॉलेजने खूप मोठे यश प्राप्त केले आहे. संस्थेच्या माध्यमातून यापुढेही आपण विविध शैक्षणिक उपक्रम राबवणार आहोत. आता नीट आणि जेईईचे प्रशिक्षणही संस्थेत विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचेही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यानंतर शाखांच्या सर्व प्रमुखांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे सूत्रसंचालन प्राध्यापक शैलेश वाजेकर यांनी केले

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply