Thursday , March 23 2023
Breaking News

मोदी सरकारची कामगिरी जनतेपर्यंत

खारघरमध्ये न्यू इंडिया चौपाल मोहिमेचा प्रारंभ, मान्यवरांची उपस्थिती, नागरिकांचा प्रतिसाद

खारघर : रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी म्हणून भाजपतर्फे जनजागृती सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खारघर शहरात मोदी सरकारच्या विविध योजनांची सविस्तर माहिती न्यू इंडिया चौपालच्या माध्यमातून करण्याचे काम सुरू झाले आहे.खारघर येथे महापौर डॉ.कविता चौतमोल यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, खारघर भाजपाध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल विधानसभा क्षेत्रातील विविध मोक्याच्या ठिकाणी वरील संदर्भाची व्हॅन उभी राहून त्याद्वारे योजनांची माहिती, लाभार्थ्यांची प्रतिक्रिया व पथनाट्याद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. चतुर्भुज सोसायटी, ब्युटीफुल समोर, शिल्प चौक, से. 21, खारघर येथे या उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.

Check Also

पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, …

Leave a Reply