Breaking News

महिला पोलिसांची फसवणूक करणार्या तोतया पोलिसाला अटक

बनावट फेसबुक अकाऊंटवरुन करायचा मैत्री

पनवेल : वार्ताहर

पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्याद्वारे महिला पोलिसांसोबत फेसबुक वरुन मैत्री करुन त्यांच्याकडून रोख रक्कम उकळणार्‍या भामट्याला एका महिला पोलिसानेच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना उघडकिस आली आहे. मिलींद रमेश देशमुख (28) असे या भामट्याचे नाव असून कळंबोली पोलिसांनी त्याला फसवणुकीसह इतर कलमाखाली अटक केली आहे.

या भामट्याने अनेक महिला पोलिसांकडून व इतर महिलांकडून रोख रक्कम उकळली असल्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून त्याची कसुन चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला मिलींद देशमुख या भामट्याने फेसबुकवर पोलिसाच्या युनिफॉर्ममधील दुसर्‍याच व्यक्तीचा फोटो ठेवून पीएसआय गणेश मोरे या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले होते. त्यानंतर त्याने पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवून अनेक महिला पोलिसांना व इतर महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री केली होती. पंधरा दिवसापूर्वी कळंबोलीत राहणार्‍या व सध्या मुंबई पोलीस दलात असल्याचे उघड झाले. त्यानुसार या भामट्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिसला देखील त्याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. या फेसबुकवर पोलीस उप निरीक्षकाच्या युनिफार्म वरील फोटो असल्याने महिला पोलिसाने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली होती. त्यानंतर भामट्या मिलींद देशमुख याने या महिला पोलिसाला मसेंजरवरुन संपर्क साधुन त्यांच्याकडून त्यांचा मोबाइल नंबर घेऊन त्यांच्या सोबत बोलण्यास सुरुवात केली. भामट्याने महिला पोलिसाला गोड बोलून पैशांची गरज असल्याचे सांगून गुगल पेवरुन दहा हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यावेळी महिला पोलिसाने त्याच्यावर विश्वास ठेवून दहा हजार रुपये पाठवून दिले. मात्र, त्यानंतर देखील भामटा मिलिंद देशमुख हा सतत पैसे मागत असल्याने या महिला पोलिसाला त्याच्यावर संशय आला.

त्यामुळे महिला पोलिसाने त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याने कल्याण रेल्वे स्टेशनवर भेटण्यासाठी बोलावून घेतले. त्यानुसार महिला पोलीस गेल्या असताना, त्या ठिकाणी त्यांना कैलाश शिवराम भांडे नावाचा अनोळखी व्यक्ती भेटला. त्याच्याकडे महिला पोलिसाने अधिक चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्याजवळ असलेला मोबाइल काढून त्याच्यावर पीएसआय गणेश मोरे या नावाचे फेसबुक खाते दाखविले. तसेच त्यानेच फेसबुक खाते तयार केल्याचे व त्याच्यावरुनच तो बोलत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर भामटयाने पीएसआय गणेश मोरे या नावाचे बनावट फेसबुक खाते तयार करुन तसेच पोलीस उप निरीक्षक असलेचे खोटे सांगून त्यांची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर या महिला पोलिसाने त्याला पकडून कळंबोली पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलीसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, त्याचे नाव कैलाश शिवराम भांडे नसून, त्याचे खरे नाव मिलींद रमेश देशमुख आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली. या भामटयावर अशाच प्रकारचे  गुन्हे दाखल असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply