Breaking News

उरण-पनवेल मार्ग सोमवारपासून दुरुस्तीसाठी बंद

उरण : बातमीदार, वार्ताहर
उरण-पनवेल हा रस्ता प्रवाशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून दररोज हजारो प्रवाशी या मार्गांवरून प्रवास करतात, मात्र उरण येथील उरण-पनवेल मार्गावरील दोन साकवच्या दुरुस्तीसाठी सोमवार (दि. 20) पासून हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भात सूचना फलक बसविले आहेत. त्यानुसार उरण-पनवेल मार्गावरील उरण रेल्वे स्थानक व आनंदी हॉटेलजवळील दोन साकव (मोर्‍या) नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी सोमवार (20 मार्च) पासून उरण-पनवेल मार्गावरील बोकडवीरा पोलीस चौकी ते उरण कोटनाका (राघोबा मंदिर) हा मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. प्रवाशी वर्गांचे प्रवासात होणारे हाल, जनतेच्या मागणीचा विचार करून व भविष्यातील होणारे अपघात टाळण्यासाठी पूल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे समजते.

असा असेल पर्यायी मार्ग

उरण पनवेल हा महत्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याने उरण शहरात व शहरातून ये-जा करण्यासाठी नागरिकांनी नवीन शेवा-उरण चारफाटा मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply