Breaking News

अशोक दुधे रायगडचे नवे पोलीस अधीक्षक

पनवेल : वार्ताहर
रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अशोक दुधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाच्या गृह विभागाकडून बुधवारी (दि. 7) भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदलीने पदस्थापना करण्याचे आदेश काढण्यात आले. या आदेशानुसार रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची बदली करण्यात आली आहे, तर त्यांच्या जागी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-2 (पनवेल)चे उपायुक्त अशोक दुधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply