Breaking News

नारपोली येथील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती सुरूच असून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नारपोली येथील शेकापचे कार्यकर्ते कृष्णा मोरे यांनी शनिवारी (दि. 18) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे आमदार महेश बालदी यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास तालुका उपाध्यक्ष प्रवीण खंडागळे, गुळसुंदे जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, पंचायत समिती विभाग अध्यक्ष सुनील माळी, पोयंजे पंचायत समिती विभाग अध्यक्ष प्रवीण ठाकूर, वावेघर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय चव्हाण, सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत माळी, झोपडपट्टी सेल तालुका अध्यक्ष महादेव कांबळे, सावळे तंटामुक्ती कमिटी माजी अध्यक्ष रामचंद्र केदारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा मोरे यांच्यासह कान्हा मोरे, तुकाराम मोरे, युवा कार्यकर्ते सुमित मोरे, अभिषेक मोरे, कौशल मोरे, संकेत मोरे, अभिजित मोरे, भावेश मोरे या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे विकासाचे कमळ हाती घेतले. सर्वांचे स्वागत करण्यात आले.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply