Breaking News

पनवेल मनपा ज्युनिअर केजीच्या वर्गासाठी 27 मार्चपासून प्रवेश अर्ज

पनवेल : वार्ताहर
सर्वसामान्य घटकातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे या हेतूने पनवेल महापालिकेमार्फत शैक्षणिक वर्ष 2022-23पासून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक 2023-24साठी ज्युनियर केजीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मागील वर्षी महापालिकेच्या या शाळेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या शाळेचे पनवेलकरांकडून स्वागत होत आहे.
महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर केजी या वर्गाचे द्वितीय वर्ष लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय येथे सुरू होत आहे. या वर्गातील विद्यार्थ्यांची क्षमता 40 असणार असून शिक्षण मोफत आहे. महापालिकेच्या तीन किमी परिसरातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. या वर्गासाठी प्रवेश अर्ज प्रक्रिया 27 मार्च सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे, तर प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी लवकरात लवकर प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
या प्रवेश अर्जांची लॉटरी 17 एप्रिल दुपारी 11 वाजता काढण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय, दांडेकर हॉस्पिटल व आगरी समाज हॉलसमोर उपलब्ध असणार आहेत. अधिक माहितीसाठी भारती धोंगडे (8097570697), सोनल भिसे (9773469803) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी (प्र) किर्ती महाजन यांनी केले आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply