Breaking News

मृत्यूनंतरही पोलीस अधिकार्‍याने जोपासली सामाजिक बांधिलकी

 

हृदय, किडनी आणि डोळे केले दान
पाली ः प्रतिनिधी
मरावे परी अवयव रुपी उरावे ही उक्ती पोलीस उपनिरीक्षक गणपत अंबाजी पिंगळे (वय 57) यांनी मरणोत्तर अवयवदान करून सार्थ करून दाखवली आहे. आपल्या सेवा काळातसुद्धा त्यांनी अनेक सामाजिक कार्यात योगदान दिले आहे. रायगड जिल्ह्यातील ठाकूर समाजतील ते पहिले पोलीस उपनिरीक्षक आहेत.
गणपत पिंगळे हे नागोठणेनजीक रा. पिंपळवाडी, वासगाव, येथे वास्तव्यास होते, तर मुंबई गोवंडी येथे ते पूर्वी कार्यरत होते. आपल्या गावी असतांना त्यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यांना ब्रेनस्ट्रोक आला. त्यांना पनवेल कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र तेथे त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. मरणोत्तर अवयवदान करावे हा संकल्प गणपत पिंगळे यांनी केला होता. त्यानुसार त्यांच्या कुटुंबियांना अवयवदानाचा निर्णय घेतला. गणपत पिंगळे यांचे डोळे, किडनी व हृदय काढून गरजवंतांना पाठविण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. पिंगळे हे कष्टकरी ठूुर समाजातून येऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन पोलीस अधिकारी झाले होते. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात एटीएस कमांडो अधिकारी म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी सुधागड तालुक्यातील शरदवाडी येथील दारूकांडबाबत केलेले काम व मदत उल्लेखनीय होती.
रुग्णालयाने दिली मानवंदना
एमजीएम रुग्णालयाच्या स्थापनेपासूनची अशा प्रकारे विविध अवयवदान करण्याची ही दुसरी घटना आहे. या वेळी रुग्णालयाने गणपत पिंगळे यांना मानवंदना दिली. रुग्णालयाचे डीन, व्यवस्थापक यांच्यासह सर्व पदाधिकारी, डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply