Breaking News

पनवेलच्या सूकापूरमध्ये सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील सुकापूर येथे सुकापूर प्रीमियर लीग व ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने सरपंच चषक 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 24) झाले. या वेळी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत प्रोत्साहित केले.
सुकापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात 24 ते 26 मार्चदरम्यान ही स्पर्धा खेळली जात आहे. स्पर्धेत विजेत्या पहिल्या तीन संघांना रोख रक्कम व भव्य चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, नेरे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, सरपंच योगिता पाटील, उपसरपंच दिवेश भगत, किशोर सुरते, प्रमोद भिंगारकर, ज्ञानेश्वर पाटील, अप्पा गायकवाड, आत्माराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप म्हसकर, पुष्पा म्हसकर, अनिता पाटील, पूनम भगत, माजी उपसरपंच बुवाशेठ भगत, रेणुका खुटले, माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, अलुराम केणी, माजी ग्रामपंचायत सदस्य परशुराम पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील, महिला मोर्चा सरचिटणीस प्रिया वाघमारे, विनायक शेळके, शिवराम शेळके, चांगदेव ठाकूर, संजय पाटील, प्रकाश म्हसकर, अनंत पाटील, प्रमोद भगत, प्रदीप ठाकरे, आयोजक राजेश पाटील, महेश पाटील, गुरुनाथ पोपेटा, पंकज पोपेटा, रूपेश पाटील, निलेश पोपेटा, रोशन जाधव, प्रशांत लांगडे, धीरज फुलोरे, राहुल  पोपेटा, उदय म्हसकर, मोहन दळवी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Check Also

पतंग महोत्सवातून मकरसंक्रात सणाचा आनंद द्विगुणित

पनवेल : रामप्रहर वृत्तमकरसंक्रांत सणाच्या औचित्याने पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या …

Leave a Reply