Breaking News

भाजपकडून राहुल गांधीविरुद्ध घोषणाबाजी

ओबीसींचा अपमान केल्याने खारघर व कामोठ्यात केला धिक्कार
पनवेल ः रामप्रहर वृत्त
‘मोदी’ आडनावावरून बेताल वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पक्षातर्फे खारघर आणि कामोठे येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा शुक्रवारी (दि. 24) निषेध करण्यात आला. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या कर्नाटकमधील प्रचार दौर्‍यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाच्या विकासाबद्दल किंवा नागरिकांच्या भल्याचे विधान करण्याऐवजी सर्व चोरांचे नाव मोदी कसे? अशी टीका भर सभेत केली होती. याविरोधात सुरत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा सुनावली. अशा बेताल वक्तव्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेली समाजातून येतात.तेली समाज हा ओबीसींमधला मोठा घटक आहे. पंतप्रधान मोदींसारख्या नेतृत्वाला जातीवाचक शिव्या देणे हा गुन्हा असून कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी खारघर येथील जनसंपर्क कार्यालय व भाजपा मध्यवर्ती कार्यालय तसेच कामोठे येथे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
या वेळी कामोठे येथे भाजपचे शहर अध्यक्ष रवी जोशी, पनवेल महापालिकेचे माजी नागरसेक विजय चिपळेकर, विकास घरत, उत्तर रायगड ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, कामोठे शहर युवा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस सुशील शर्मा, भटके विमुक्त सेलच्या जिल्हा महिला प्रमुख विद्या तामखेडे, कामोठे महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, तर खारघर येथे भाजपचे खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक अभिमन्यु पाटील, प्रवीण पाटील, नरेश ठाकुर, ओबीसी मोर्चा खारघर मंडल अध्यक्ष सुरेश ठाकुर, उपाध्यक्ष संजय घरत, उपाध्यक्षा बिना गोगरी, सरचिटणीस साधना पवार, युवा मोर्चा सरचिटणीस अमर उपाध्याय, उत्तर भारतीय मोर्चा संयोजक विनोद ठाकुर, शिक्षक सेलचे संदीप रेड्डी, प्रभाकर बांगर, पप्पु खामकर, सुस्मित डोळस, क्षमा राव, प्रवीण बेरा, योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply