Breaking News

गावागावांत जनता कर्फ्यूची हाक

पनवेल : बातमीदार – नवी मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या सर्वांच्या चिंतेचे कारण ठरली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील गावागावांत स्वयंघोषित जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात येत आहे. घणसोली गावात सलग सहा दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले असून मंगळवारपासून गावात हा कर्फ्यू लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. कोपरखैरणेतील ग्रामस्थांनीही जनता कर्फ्यूची हाक दिली आहे.

पहिल्या आणि दुसर्‍या दिवशी अत्यावश्यक सेवेसह अन्य दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली. वृद्ध, दिव्यांग आणि गरोदर महिला तसेच रुग्णांसाठी अत्यावश्यक मोफत वैद्यकीय सेवेसाठी गावकीच्या वतीने 3 मेपर्यंत एक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वाहने गावात फिरणार नाहीत, हेही स्पष्ट केले आहे आणि सर्वांना गावात घरातच

राहण्याचे आवाहन गावकीच्या वतीने करण्यात आले आहे.

घणसोली परिसरात आतापर्यंत 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. औषधांची दुकाने आणि दवाखाने वगळता गावातील किराणा दुकाने, भाजीपाला, दूध, मासळी, चिकन आणि मटण दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. घणसोली गावात येण्या-जाण्यासाठी एकूण 11 प्रवेशद्वारे आहेत. येथे ग्रामस्थांनी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करून बाहेरील व्यक्तीला प्रवेशबंदी केली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply