पनवेल रेल्वे स्थानकातील घटना
पनवेल : वार्ताहर
पनवेल रेल्वे स्थानकातील आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचा जीव बचावल्याची घटना घडली आहे.
पनवेल रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच वर ट्रेन क्रमांक 12617 मंगला एक्स्प्रेस आली होती सदर ट्रेन पकडण्यासाठी प्रवासी जितू बिना (वय 30) हा धावत होता दरम्यान सदर ट्रेन सुटल्याने तो प्रवासी ट्रेन व फलाटामधील मोकळ्या जागेत पडला असताना तेथे कर्तव्यावर असलेले आरपीएफचे पोलीस हवालदार विशाल माळी यांनी जीवाची पर्वा न करता तिथे धाव घेऊन त्या व्यक्तीस पकडले व तसेच त्याला त्या मोकळ्या जागेत पकडून ठेवले पूर्ण ट्रेन फलाटाच्या बाहेर पडल्यावर त्याला बाहेर काढण्यात आले.
थोडक्यात आरपीएफ जवान विशाल माळी याच्या सतर्कतेमुळे त्या प्रवाशाचा जीव बचावला होता या अपघातात त्या प्रवाशाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.