Friday , June 9 2023
Breaking News

एकविरा आईच्या पालखी सोहळ्यासाठी आपट्याचे कोळी बांधव कार्ल्याकडे रवाना

मोहोपाडा ः प्रतिनिधी

कार्ला (लोणावळा) येथील प्रसिद्ध एकविरा आईच्या चैत्री यात्रेनिमित्त पालखीचा मान यंदा पनवेल तालुक्यातील आपटा येथील कोळी बांधवांचा आहे. या पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने आपट्यातील कोळी बांधव, भगिनी एकविरा आईच्या नावाचा जयघोष करीत कार्ला येथे रविवारी (दि. 26) रवाना झाले.
महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तिपीठे आहेत. जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी. लोणावळ्याजवळील वेहेरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा ही एक आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे. विशेषतः आगरी-कोळी बांधवांचे ते श्रद्धास्थान आहे.
नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखल्या जाणार्‍या एकवीरा आईची चैत्र महिन्यात यात्रा भरते. या वेळी कोकणातील आगरी-कोळी बांधवांसह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनास व नवस फेडण्यासाठी येतात. या वर्षी मंगळवारी (दि. 28) पालखी सोहळा असून भाविक त्यासाठी सज्ज झाले आहेत.

Check Also

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …

Leave a Reply