Breaking News

नदीत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुक्यातील वाजे गावाच्या हद्दीतील गाढेश्वर धरणाकडे जाणार्‍या रस्त्यावरील नदीच्या पात्रात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून पनवेल तालुका पोलिसांनी प्राथमिक तपासाद्वारे आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

मैदि निरगुडा (वय 50, रा. टॉवरवाडी) असे या महिलेचे नाव असून तिचा मृतदेह गाढेश्वर धरणाकडे जाणार्‍या रस्त्यावरील नदीच्या पात्रात पनवेल तालुका पोलिसांना आढळून आला होता व त्यावेळी नदीच्या कातळावर काही कपडे, पिशवी, चप्पल, मोबाईल फोन आढळून आले होते. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील व त्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते व त्यांनी तेथे आढळलेल्या वस्तू नुसार व मोबाईल मार्फत तिच्या नातेवाईकांकडे संपर्क साधला असता मैदि निरगुडा असे या महिलेचे नाव असून ती विधवा आहे.

तिला तीन मुले असल्याची माहिती मिळाली आहे. त्या परिसरात फार्महाउस व इतर ठिकाणी मिळेल ती कामे करून आपला उदरनिर्वाह चालवीत असल्याची माहिती मिळाली आहे त्यानुसार पनवेल तालुका पोलीस पुढे शोध घेत आहे.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply