माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील चिंचवली येथे श्री राम क्रिकेट क्लब ब-च्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष चषक 2023 नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 31) झाले.
चिंचवली येथील गावदेवी मैदानात खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास एक लाख रुपये, द्वितीय 50 हजार रुपये, तिसर्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकास 25 हजार आणि सर्व विजेत्यांना चषक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास सरपंच अनुसया वाघमारे, अमर शेळके, माजी उपसरपंच रमेश पाटील, अविनाश शेळके, शांताराम चौधरी, सुनील शेळके, रामदास शेळके, विठ्ठल शेळके, नरेश पवार, गुरूनाथ करमेलकर, बाळाराम पाटील, दयेश जांभळे, भालचंद्र भोपी, उमेश पाटील, सतीश पाटील, सुनील पाटील, संजय पाटील, विष्णू वाघमारे, अक्षय पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते. ही स्पर्धा 4 एप्रिलपर्यंत रंगणार आहे.