उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होणे, ही समस्या सामान्य आहे. उन्हात राहणार्या किंवा ऊन सहन करता येत नाही अशा लोकांना उष्माघाताचा त्रास होतो. त्यामुळे डोकेदुखी, चिडचिड, लूज मोशन, मळमळ यासारख्या समस्या निर्माण होतात. आता उन्हाळ्याने दार ठोठावले आहे. अशा परिस्थितीत लोकांनी उष्माघाताची विशेष काळजी घ्यावी. उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी फक्त काही खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. अशा खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ज्याचे सेवन केल्याने उष्माघात टाळता येऊ शकतो.
उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे ठरते फायदेशीर
काकडी जरूर खा – जर तुम्ही उन्हात प्रवास करत असाल किंवा जास्त वेळ उन्हात काम करत असाल तर तुमच्या आहारात सलाडच्या स्वरूपात काकडीचा समावेश करू शकता. काकडी ही शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्यात व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के, पोटॅशिअम आणि मँगनीजसारखे पोषक घटक आढळतात. तसेच शरीराला पाण्याचा पुरवठा होतो. पचनसंस्थाही चांगली राहते.
दही खाणे ठरते फायदेशीर – दही शरीरात प्रोबायोटिकचे काम करते. यात लॅक्टिक सिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. ताक किंवा रायत्याच्या स्वरूपातही दह्याचे सेवन करता येते. यामध्ये काही सॅलड्सचाही समावेश करता येईल. लस्सी पिणे देखील फायदेशीर आहे.
कांदा खा – उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कांदा खूप महत्त्वाचा आहे. कांदा सलाडच्या स्वरुपात खाऊ शकता. कांदा हा शरीराला थंड ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे उष्णतेचा शरीरावर परिणाम होत नाही. तुम्ही दही आणि कांद्याची कोशिंबीर बनवून खाऊ शकता.
पुदीन्याचे सेवन ठरते लाभदायक – पुदीन्यामध्ये मेन्थॉल असते. हे उष्माघातापासून संरक्षण करून शरीराला थंड ठेवते. त्यामुळे उष्णतेचा शरीरावर परिणाम होत नाही व उष्माघाताचा त्रास होत नाही.
बेळफळाचे सरबत प्यावे – उन्हाळ्यात बेल फळांचीही बाजारात विक्री सुरू होते. बेलमध्ये भरपूर फायबर असते. ते आतड्यांना फिट करून पचनसंस्था मजबूत करते. त्यातील अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात.