Breaking News

बसखाली येऊन अल्पवयीन बाईकस्वाराचा मृत्यू

नवी मुंबई ः बातमीदार
नेरूळ जिमखाना सेक्टर 28 नवी मुंबईच्या गेटजवळ बाईकस्वराचा बसखाली येऊन मृत्यू झाला. विवेक पटवा असे मृत तरुणाचे नाव असून तो 17 वर्षांचा होता. या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असली तरी अल्पवयीन मुलांकडून वाहने चालवली जात असल्याचे प्रमाणदेखील वाढले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नेरूळ जिमखान्याच्या सेक्टर 28च्या अरुंद रस्त्यावर विवेक डाव्या बाजूने ओव्हरटेक करीत होता. या प्रयत्नात त्याची धडक शेजारी बंद असलेल्या रिक्षाला बसली. त्याचवेळी शेजारून एनएमएमटीची बस जात होती. धडक बसल्याने शेजारून जात असलेल्या बसच्या मागच्या चाकाखाली विवेक सापडला. चाक अंगावरून गेल्याने जागेवरच विवेकचा मृत्यू झाला.
या संदर्भात नेरूळ पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा तसेच रिक्षाचालक व परिवहन चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन विवेक कोणाची बाईक चालवत होता, याचा शोधदेखील पोलीस घेत आहेत.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply