Friday , September 29 2023
Breaking News

भाजप स्थापना दिनी कर्तृत्ववान ज्येष्ठांचा सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांनी देश प्रगती करतोय -आमदार प्रशांत ठाकूर

महाड : प्रतिनिधी
आज आपला भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे प्रगती करीत आहे तसेच भारतीय जनता पक्षाला जगात एक स्थान निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाड येथे केले. भाजप स्थापना दिनानिमित्त आयोजित कर्तृत्ववान ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमास भाजप दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, संदीप ठोंबरे, जिल्हा चिटणीस मंजुषा कुद्रीमोती, सरचिटणीस महेश शिंदे, शहर अध्यक्ष निलेश तळवटकर, संकेत पोरे, नमिता दोशी, जिगेसा बुटाला आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीबांसाठीच्या, शेतकर्‍यांच्या योजनांमुळे सर्वसामान्य लोक आज समाधानी आहेत. पुढे बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्ष जगातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून वाटचाल करीत आहे आणि यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचे महत्त्वाचे योगदान आहे, असेही नमूद केले.
माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी समाजातील प्रत्येक घटक आज समाधानी आहे आणि हाच आपला विजय आहे, असे म्हटले, तर प्रगतशील शेतकरी व ज्येष्ठ नागरिक मनोहर शिंदे यांनी शेतकर्‍यांसाठी सन्मान योजना राबविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त केले.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply