चौक : प्रतिनिधी
चौक बाजारपेठेमधील अतिक्रमण हटवल्यावर तेथील स्वच्छ करून सरपंच रितु ठोंबरे यांनी मोकळ्या हवे बरोबर स्वच्छ चौक करण्यास सुरूवात केली आहे.
चौक गाव हे बकाल स्वरूप घेऊन होते. सरपंच रितु ठोंबरे व त्यांच्या टीमने अतिक्रमण मोहीम सुरू करून ती यशस्वी केली. अतिक्रमण हटविण्यात आल्यावर त्या जागेत मच्छी, चिकन व मटण यांच्या दुकानामुळे झालेली दुर्गंधी, गटारात पसरलेली घाण, प्लास्टिक पिशवी, बॉटल यांचा खच दुकानांच्या खालच्या बाजूला होतो. अतिक्रमण हटवल्यावर ते विचित्र आणि घाणेरड्या स्वरूपात येणार्या ग्राहकांना दिसत होते. तसेच स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सुरू झाला. शाळेच्या प्रवेशद्वारावर असलेल्या घाणीने लहान विद्यार्थी यांना शाळेत जाणेच नको असे वाटत होते. या सर्व बाबींची दखल घेऊन गटारातील घाण काढून त्या परिसरातील रस्ते स्वच्छ करण्याचे आदेश दिले. शुक्रवारी सकाळपासून ही मोहीम सुरू करून टँकरला जेट पंप लाऊन रस्ते स्वच्छ करण्याचे काम सुरू केले. गटारातील साठलेले प्लास्टिक सुद्धा काढण्यात आले. अतिक्रमण जागा स्वच्छ झाली असून दुर्गंधी मुक्त झाल्याने चौक गावातील जेष्ठ नागरिक, विद्यार्थी व ग्राहकांनी सरपंच रितु सुधीर ठोंबरे यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …