Breaking News

माथेरान घाटात बर्निंग कारचा थरार, चालक प्रवाशी थोडक्यात बचावले

कर्जत – प्रतिनिधी
     आज  माथेरान घाटात एका पर्यटक वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे.  या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी कार जळुन खाक झाली आहे. हुंडाई कंपनीची सी एन जी आय टेन ही कार असून या मध्ये दोन प्रवाशी प्रवास करत होते. ही आग कारचा पेट्रोल पाईप फाटला असल्याने लागली असावी. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
    जगतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान फिरण्यासाठी म्हणून उल्हास नगर येथील दोन व्यक्ती आपल्या हुंडाई कंपनीची सी एन जी आय टेन या खाजगी वाहनाने सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास आले होते. माथेरान घाट चढत असताना प्रसिद्ध असा जुमापट्टी स्थानकातील वरच्या धबधबा येथील चढावावर कारच्या पुढील भागातून आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनात आले.  सावधगिरी बाळगत चालकाने कार रस्त्यात उभी करून कारच्या बाहेर सुखरूप पडले होते. यावेळी रस्त्यावरील वाहतूक बाधित झाली होती.  कारने अचानक भडका घेत कार जळून खाक झाली.
     नेरळ टॅक्सी चालक मालक संघटना व  ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीचा भडका अधिक असल्याने कार पूर्णतः जळाली आहे. कार सी एन जी  गॅस असून घाटात चालक हा कार पेट्रोल वर चालवत असताना पेट्रोल पाईप फाटल्याने हा प्रकार घडला असावा. असा अंदाज येथील वाहन चालकांकडून लावला जात आहे. घटनास्थळी माथेरान अग्निशमन दलाचे वाहन पोहचले होते परंतु तो पर्यंत कार पूर्णतः जळून खाक झाली तर जे सी बी  च्या साह्याने कार बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply