Breaking News

घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात मारली हातोडी

खून केल्याची पतीने दिली कबुली
पनवेल : वार्ताहर
कामोठे येथे राहणार्‍या एका महिलेच्या डोक्यावर वार करून खून केल्याची घटना घडली होती. याबाबत मयत महिलेच्या भावाने याविषयी कामोठे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार कऱण्यात आलेल्या विशेष पथकाने हत्या करणार्‍या पाटील अटक केली आहे.
कामोठे येथील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स, रूम नंबर 401, सेक्टर 11, येथे बिरप्पा श्रीरंग शेजाळ याने त्याच्या पत्नीच्या डोक्यात कोणत्यातरी जड व टणक वस्तू डोक्यात मारून तिचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केला असल्याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा करून जागेवरच मोबाईल बंद करून गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारसह फरार झाला होता. त्यामुळे वरिष्ठांनी सदर गुन्ह्यातील आरोपीस तत्काळ ताब्यांत घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार पोलिसांच्या विशेष पथकाने सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तांत्रिक तपासच्या आधारे आरोपी हा आदमापुर (ता. भुदरगड जि. कोल्हापूर) येथे लपवून राहत असल्याचे निष्पन्न झाले होते. या ठिकाणीं तत्काळ पथक रवाना झाले व आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी गुन्ह्याची चौकशी केली असता, त्याने पत्नीशी वारंवार होणार्‍या घरगुती वादातून रागाच्या भरात डोक्यात हातोडी मारून तिचा खून केला कबुली दिली आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीकामी कामोठे पोलीस ठाणे याच्या ताब्यात देण्यात आले आहे

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply