अपुर्व प्रशांत ठाकूर यांचाही सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्त
नितळस छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या माध्यमातून कुस्त्यांचे जंगी सामने मंगळवारी (दि. 11) गावदेवी यात्रेनिमित्त भरविण्यात आले होते. या स्पर्धेला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत आमदार प्रशांत ठाकूर यांचे पुत्र अपुर्व ठाकूर यानेही सहभाग घेतला होता.
या वेळी भाजप नेते एकनाथ देशेकर, भाजपचे तालुका सरचिटणीस नितळस तालीमचे वस्ताद डि. बी. म्हात्रे, पनवेल तालुका कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बळीराम पाटील, विनोद नाईक, नितळसचे सरपंच संदीप पाटील, माजी सरपंच शरद पावशे, भार्गव सांगडे, उपसरपंच कैलास मढवी, धर्माशेठ पावशे, मारुती पावशे, दत्ता पाटील, गुरुनाथ पावशे, संतोष गोंधळी, रुपेश पावशे, विकास पावशे, साजन पावशे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि खेळाडू उपस्थित होते.
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर संस्थापक अध्यक्ष असलेल्या छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या वतीने गावदेवी यात्रेनिमित्त कुस्त्यांचे जंगी सामन आयोजित करण्यात
आले होते. स्पर्धेतील अंतिम सामना नरेश म्हात्रे विरुद्ध हरेश कराले यांच्यात रंगला. हा सामना बरोबरीत संपला.