Breaking News

प्रेमसंबंधाच्या रागातून बापाने केली मुलीची हत्या

खालापूर तालुक्यात खळबळ

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
बिहार राज्यातून आलेल्या कुटूंबातील 14 वर्षीय मुलीचा बापाने खून करून धड आणि शीर नदीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार खालापूर हद्दीत घडला. या घटनेनंतर क्रूरकर्मा बाप फरारी झाला आहे.
खालापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय सुदर्शन सिंह (वय 50, रा. कुद्रा, जि. कैमुर भबुआ, बिहार)हा त्याची पत्नी आणि दोन मुलींसह चार दिवसांपूर्वी खालापूर तालुक्यात आला होता. खोपोली शहरातील एका लॉजवर हे कुटूंब राहिले होते. शुक्रवारी (दि. 5) 5 वाजता अजय पत्नी आणि मुलीसह हाळ गावानजीक म्हाडा कॉलनीच्या मागे निर्जनस्थळी गेला. मोठी मुलगी खुशी हिचे राजेश नावाच्या व्यक्तिशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून अजयने खुशीला चाकूने भोसकून तिचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर धड आणि शीर पाताळगंगा नदीत फेकून दिले.
या घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदार खुशीची आई आणि 12 वर्षीय बहिणीने घटनास्थळावरून हाळ गावात पळ काढला. या घटनेची माहिती जागरूक नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, निरीक्षक अनिल विभुते, उपनिरीक्षक अंबिका अंधारे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. खुशीचे धड नदीत सापडले असून, शनिवारी नदीपात्रात शोध घेऊनसुद्धा शीर सापडले नव्हते, तर अजय खून करून फरारी झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply