Breaking News

सर्वांनी मिळून महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा यशस्वी करू-पालकमंत्री उदय सामंत

खारघर येथे घेतला पूर्वतयारीचा आढावा

खारघर : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022च्या वितरण सोहळ्याची जोरात तयारी सुरू असून सर्व शासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वयाने काम करावे, सर्वांनी मिळून हा सोहळा यशस्वी करूया, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज खारघर येथे दिल्या.
2022 या वर्षासाठीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (दि. 16) देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 12) बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त तिरुपती काकडे, वास्तुविशारद योगेश वाजेकर, माजी नगरसेवक अभिमन्यू शेठ पाटील, अ‍ॅड. नरेश ठाकूर, प्रवीण पाटील, वासुदेव पाटील, कीर्ती नवघरे, हॅप्पी सिंग, खारघर मंडल अध्यक्ष बिजेश पटेल आदींसह श्री सदस्य उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी शुक्रवारपासून उपस्थित राहणार्‍या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय, सुरक्षाव्यवस्था, वाहनांसाठी पार्किंग, विविध ठिकाणांहून नवी मुंबईला जोडणारे रस्ते अशा मूलभूत सेवा सुविधांसाठी आवश्यक साधन सामग्रीबाबत आढावा घेतला. यासाठी श्री सदस्य हे शासन आणि प्रशासनाला सहकार्य करतील, अशा सूचना दिल्या.
महाराष्ट्र भूषण या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी 306 एकर क्षेत्रात तयारी सुरू आहे. या कार्यक्रमासाठी 18 लाख 36 हजार लोकांसाठी आसन क्षमता आहे. सार्वजनिक वाहतुकीकरिता (बस, रेल्वे, कॅब) आठ लाख 43 हजार 240, खासगी बस नऊ लाख 15 हजार 760, खासगी कार 77 हजार एवढे लोक येतील. याकरिता पार्किंगची आवश्यकता 16 हजार 650 तर कार 11 हजार (उपलब्धता 16 हजार 785) एवढी आहे. सभामंडपात उत्तर दिशेला वैद्यकीय केंद्र, पाणीटँकर, रुग्णवाहिका, कार्डियाक रुग्णवाहिका, मोबाईल टॉयलेट या सर्व व्यवस्था असणार आहेत, तर सभागृहाच्या पश्चिमेला वाय-1 ते वाय-13 स्टेज (प्रतिबंधित क्षेत्र) असेल, तर ब्लॉक 2,3,4,5,6,7 असे असणार आहेत. ब्लॉक चारमध्ये आरक्षित व्यवस्था असेल.
मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्याकरिता टाटा मेमोरिअल कॅन्सर हॉस्पीटल, गुरुद्वारा, गोल्फचे मैदान, उत्स्व चौक, खारघर स्टेशन, मुंब्रा-पनवेल महामार्ग, सोन-पनवेल हायवे या मार्गाने व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग व्यवस्था-2 ऑरेज झोन- कोकण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ या ठिकाणांहून वाहने येतील. कोपरा (330 बस/कार), मुरबीने मैदान (580 बस/कार ), एक्सस्टोर-15 ग्राऊंड (400 बस/कार), सेक्टर-16, (770 बस/ कार ), जामशेद ठाकरे एडक्लिफ स्कूल ग्राऊड (40 बस/कार ), केएलआयइएस कलंबोली (490 बस/ कार), रोडपाली क्रीडा मैदान (1510 बस/कार), खांदेश्वर रेल्वे स्टेशन मैदान-1 व मैदान-2 अनुक्रमे 700 ते 560, रोडपाली सेक्टर-20अंतर्गत रस्ते -340 ते 200, कामोठे अंतर्गत रस्ते-400 ते 200 असे एकूण पार्किंग -2 ऑरेज झोनमध्ये 7250 बस तर 4040 कारची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग-1मध्ये 2285 बस तर 1934 कारची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी गुजरात, उत्तर प्रदेश, जव्हार, वाडा, पालघर, डहाणू, भिवंडी, आदी ठिकाणांहून वाहने येतील. पार्किंग-1मध्ये भारती विद्यापीठ ग्राऊंड उत्स्व चौक, सेक्टर-5,6,7 उत्सव चौक सेट्रल सेक्टर-19, 20 सीबीडी स्टेशन पार्किंग सीबीडी सेक्टर-11 अंतर्गत रस्ते आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
पार्किंग व्यवस्था-3 ब्ल्यू झोन- नाशिक, धुळे, जळगांव, नंदूरबार, जालना, संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, मध्यप्रदेश आदी ठिकाणांहून 7250 बस तर 3411 कारकरिता पेटगांव, खडकी ग्राऊंड, तळोजा, इनामपुरा ग्राउंड-1, 2, ओवे कॅम्प ग्राऊंड, अमनदूत स्टेशन रोड, वास्तूविहार रोड, तळोजा जेल रोड आदी ठिकाणी वाहतूक पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
या वेळी महापालिका, पोलीस यंत्रणा, सिडको यासर्व यंत्रणांकडून पुरविण्यात येणार्‍या सुविधा, आवश्यक वस्तूंची आकडेवारी मागविण्यात आली होती. सुमारे 20 लाख नागरीक या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, इतक्या प्रचंड जनसमुदायाची गैरसोय होऊ नये, याबाबत सर्व यंत्रणांना काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन येणार्‍या प्रत्येक नागरिकाला मुखपट्टी (मास्क) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर, रुग्णावाहिका, आवश्यक औषधांचा पुरवठा तैनात ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाकडून फायर ऑडिट करुन घेण्यात येत आहे, तसेच श्री सदस्यांना आपातकालीन परिस्थितीत आग विझवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply