Wednesday , February 8 2023
Breaking News

जेएनपीटी आणि नॉर्वे यांची परस्पर सहकार्याच्या संधीसंदर्भात चर्चा

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

नॉर्वे येथील कन्स्युल जनरल सुश्री ऍन ऑलस्टेड यांनी भारतातील महत्त्वपूर्ण कंटेनर पोर्ट म्हणून महती प्राप्त झालेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला भेट देऊन जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि पोर्ट ऑफ ओस्लोमध्ये परस्पर सहकार्य आणि दीर्घकालीन विकासाबाबतच्या संधींवर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये नेहमीच सबळ आणि सौहार्दपूर्ण संबंध आहेत. दोन्ही देश एकमेकांना आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण भागीदार समजतात. दोन्ही देशांकडून केले गेलेले सहकार्यात्मक प्रयत्न त्यांना ज्ञानाच्या देवाणघेवाणीमध्ये मदत करतील, ज्यामुळे समुद्री व्यापाराला आणखीन दृढता मिळेल.

जेएनपीटी आयएएसचे अध्यक्ष संजय सेठी आणि नॉर्वेच्या कन्स्युल जनरल सुश्री ऍन ऑलस्टेड यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि पोर्ट ऑफ ऑस्लो यांच्यामार्फत केल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण विकासावर सविस्तर चर्चा केली. त्यांनी हरित अग्रक्रम, तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण यांसारख्या दोन्ही बंदरांकडून हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांवर चर्चा केली आणि परस्पर समर्थनासाठी महत्त्वपूर्ण मार्गांचा शोध घेतला. पुढे प्रतिनिधी मंडळाने जेएनपीटीच्या एकंदरीत कार्याबद्दल, विकासाबद्दल विशेषकरून व्यापार करण्याच्या सुकरतेला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यान्वयित केलेल्या नवीन अग्रक्रमांवर त्याचप्रमाणे बंदरामध्ये व्यवसायाची कार्यक्षमता आणि दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाच्या केलेल्या अंगीकारावर आधारित संक्षेपित प्रेझेंटेशन किंवा सादरीकरणदेखील पाहिले. यानंतर जेएनपीटीच्या कार्यश्रेणीची पाहणी करण्यासाठी बंदराला भेट देण्यात आली. या भेटीमुळे प्रतिनिधींना बंदराचा आणि जागतिक बाजारपेठेमध्ये असलेल्या त्याच्या महत्त्वाचा सविस्तर आढावा घेता आला.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply