Breaking News

एकटपाडा येथे घरफोडीत सव्वा दोन लाखाचा ऐवज चोरी

पनवेल : वार्ताहर

घरात कोणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून घरातील सुमारे सव्वा दोन लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील एकटपाडा येथील विशाल हाईट्स इमारतीत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एकटपाडा गाव येथील विशाल हाईट्स इमारतीत राहणार्‍या सुवर्णा आप्पाराव कांबळे यांच्या घरात रात्रीच्या वेळी कोणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने 1 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र 25 ग्रॅम, 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचा हार 15 ग्रॅम, 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे झुमका 10 ग्रॅम, 10 हजार रुपये किमतीचे सोन्याची अंगठी 2.5 ग्रॅम, 4 हजार रुपये किमतीचे सोन्याचे पान 1 ग्रॅम, 4 हजार रुपये किमतीचे सोन्याची नथ, 2 हजार चारशे रुपये किमतीचे चांदीचे पैजण 6 लोळे, बाराशे रुपये किमतीचे चांदीचा छला 3 तोळे, 3 हजार रुपये रोख असा एकूण 2 लाख 24 हजार सहाशे रुपये किंमतीचे ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply