Breaking News

म्हसळ्यात बेटी बचाओ बेटी पढाओ! रॅली

मुलींचे शिक्षण ते आरोग्य जपण्यासाठी ‘आयसीडीएस’ सज्ज

म्हसळा : प्रतिनिधी

एकात्मिक बाल विकास केंद्र (आयसीडीएस) च्या प्रकल्प अधिकार्‍यांसह अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देण्यासाठी म्हसळा शहरात जनजागृती रॅली काढली होती. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी पथनाट्येही सादर करण्यात आली. म्हसळ्याचे गट विकास अधिकारी वाय. एम. प्रभे आणि एकात्मिक बाल विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या जनजागृती रॅलीत सभापती उज्वला सावंत, माजी सभापती छाया म्हात्रे, डॉ. सागर काटे, विस्तार अधिकारी प्रमोद गायकवाड, कल्पेश पालांडे, पर्यवेक्षिका रेणुका पाटील, दिपाली पालवे, वैष्णवी कळबावसकर, पोलीस विभागाचे संतोष चव्हाण, स्वप्नाली पवार, वैशाली वारघुडे, अंगणवाडी सेविका निधी दर्गे, सायली कार्लेकर, सानिका उद्धरकर, रेणुका पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, परिचारिका, पंचायत समिती कर्मचारी सहभागी झाले होते.

मुलींचे संरक्षण व सबलीकरणासाठी 22 जानेवारी 2015ला बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाला सुरुवात झाली. महिला कल्याण योजनांसंबंधी समाजात जागरूकता निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. लिंगनिवडीची प्रक्रिया टाळणे, मुलींचे अस्तित्व व संरक्षण तसेच शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

-व्यंकट तरवडे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास केंद्र (आयसीडीएस) म्हसळा

GirlForce: Unscripted and Unstoppable या थीमवर यंदा जगभरात बालिका दिन साजरा केला जाणार आहे. स्पर्धेच्या युगात मुलीदेखील मुलांच्या तोडीस तोड कामगिरी बजावत आहेत. त्यांना आपण सर्वांनी सबळ करू या.

-वाय. एन. प्रभे, गटविकास अधिकारी, म्हसळा

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply