उरण : वार्ताहर
मांगीरदेव क्रिकेट क्लब आणि भारतीय जनता पक्ष भवरा प्रभाग क्र. 2चे नगरसेवक नंदकुमार लांबे, नगरसेविका आशा शेलार यांच्या वतीने सालाबादप्रमाणे टेनिस क्रिकेटची मर्यादित षटकांची स्पर्धा नुकतीच मांगीरदेव मैदानात आयोजित करण्यात
आली होती. या स्पर्धेत साई श्रद्धा क्रिकेट क्लब बेलदार वाडा यांनी विजेतेपदाचा कमळ चषक पटकाविला.
स्पर्धेत द्वितीय क्रमांक रिदम क्रिकेट क्लब मांगीरदेव संघर्ष नगर, तृतीय क्रमांक मांगीरदेव क्रिकेट क्लब भवरा संघाने प्राप्त केला. विजेत्या संघांना अनुक्रमे 20 हजार रुपये, 10 हजार रुपये, पाच हजार रुपये आणि तिन्ही संघांना चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आदींना आकर्षक चषक देण्यात आले.
या वेळी उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, नगरसेवक नंदकुमार लांबे, नगरसेविका आशा शेलार, भाजपक्ष महिला मोर्चा उरण शहर अध्यक्ष संपूर्णा थळी, माजी कर्णधार महेश ठाकूर, मयूर ठाकूर, माजी खेळाडू रामचंद्र म्हात्रे, भवरा प्रभाग क्र. 2चे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते, खेळाडू उपस्थित होते.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …