Friday , September 29 2023
Breaking News

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

मान्यवरांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये गुरुवारी (दि. 27) अनमोल रिश्ते या थीमखाली नववे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात रंगले. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
स्नेहसंमेलनाच्या प्रारंभी लाईव्ह ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्कूलच्या वतीने शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या यशस्वी विद्यार्थ्यांना या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या स्नेहसंमेलनास संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, शकुंतला रामशेठ ठाकूर, वैशाली यशवंत देशमुख, संस्थेच्या कार्यकारी समिती सदस्य वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, निलेश बाविस्कर, प्रवीण पाटील, माजी नगरसेविका अनिता पाटील, नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, किर्ती नवघरे, संजय भगत, पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ, भाजप नेते प्रभाकर जोशी, रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, पीआरओ बाळासाहेब कारंडे, पर्यवेक्षक अनिता मिश्रा, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल राज अलोनी, पर्यवेक्षक इफात काते, चश्मिंदर कौर बक्षी, अरविंदर कोतवाल, गीता चौधरी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply