Breaking News

लोकनेते दि. बा. पाटील कृती समितीची बैठक

नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी पाठपुरावा करण्याचा ठराव

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात शनिवारी (दि. 29) झाली. या बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास जुलै 2022मध्ये राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्याबाबतचा ठराव लवकरात लवकर केंद्र सरकारकडे पाठवून त्याला मंजूर घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला.
कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप नेते दशरथ भगत, सहचिटणीस दीपक म्हात्रे, खजिनदार जे. डी. तांडेल, ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील, सदस्य तथा भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, दीपक पाटील, मनोहर पाटील, जगदीश गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी व जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
नवी मुंबईच्या विकासात असलेले लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान आणि स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी विचारात घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास जुलैमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुलै 2022मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर राज्य विधिमंडळाच्या झालेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान नामकरणाचा ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आला. हा ठराव लवकरात लवकर केंद सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात यावा यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे एमआयडीसीसाठी ज्या शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत त्यांना 15 टक्के विकसित जमिनी देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी आंदोलन करण्यात येणार असून या पार्श्वभूमिवर लवकरच नवी मुंबई येथे मेळावा घेण्याचा ठरावही करण्यात आला. स्थानिक प्रकल्पग्रस्तांना येथील प्रकल्पांमध्ये नोकरी द्यावी, गेल्या कित्येक वर्षांपासूनची गावठाण विस्ताराची मागणी मंजूर करून येथील गावठाणाचा मुंबई, ठाणे, पालघरपर्यंत विस्तार करावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात येणार असल्याचे भाजप नेते दशरथ भगत यांनी सांगितले.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply