Breaking News

मुंबई-गोवा महामार्गावर पिकअपची ट्रकला मागून धडक ; महिलेचा मृत्यू

पेण ः प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर पेणजवळील हमरापूर फाटा येथील ब्रीजवर भरधाव बोलेरो पिकअपने पुढे जाणार्‍या एचपी गॅस सिलेंडर घेऊन जाणार्‍या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात बोलेरो पिकअपमधील एक महिला जागीच ठार झाली असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

सुमित चंद्रकांत खवळे (रा. तारामुंबरी, ता. देवगड, जि. सिंधदुर्ग) हे बुधवारी (दि. 3) महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. एमएच. 07 एजे. 2682) देवगडवरून मुंबईला वाशी मार्केटला आंबे विक्रीसाठी घेऊन जात असताना पहाटे 4.15 वा. च्या सुमारास पेणजवळील हमरापूर फाटा येथील ब्रीजवर आले असता पुढे असणार्‍या ट्रक (क्र. एमएच 12 ईक्यू. 2208) याला ओव्हरटेक करीत असताना या ट्रकचालकाने ट्रक लेनवरून बाहेर काढल्याने ट्रकला पिकअपने क्लिनर बाजूकडून जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, बोलेरो पिकअप ट्रकच्या मागच्या बाजूस अडकून पडला. या अपघातात पिकअपचालक सुमित चंद्रकांत खवळे (वय 28, रा. तारामुंबरी, देवगड) हे गंभीर जखमी झाले, तर त्यांची पत्नी स्पृहा सुमित खवळे (वय 24, रा. तारामुंबरी, देवगड) ही जागीच ठार झाली.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघाताचे वृत्त कळताच, कल्पेश ठाकूर यांनी रुग्णांना आपल्या रुग्णवाहिकेतून तत्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दादर सागरी पोलीस व पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply