Breaking News

स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत स्पर्धा : शिवकर ग्रामपंचायत प्रथम क्रमांकाचे मानकरी

-लोकनेते रामशेठ ठाकूर यांची माहिती

पनवेल ः प्रतिनिधी

कष्टकर्‍यांचे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 35व्या पुण्यतिथीनिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव तसेच पनवेल तालुकास्तरीय स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आली होती. स्वच्छ ग्रामपंचायत स्पर्धेत शिवकर ग्रामपंचायत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.

या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथी दिनी रविवारी (दि. 7) सकाळी 10 वाजता उलवे नोडमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 3) उलवे नोड येथे पत्रकार परिषदेत दिली.

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, सदस्य वसंत पाटील, संजय भगत,  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे खजिनदार भाऊशेठ पाटील, तसेच गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, विश्वनाथ कोळी, अनंताशेठ ठाकूर, जयवंत देशमुख, किरण देशमुख यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे माहिती देताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. आयुष्यापेक्षा ध्येय मोठे असले पाहिजे, ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवली. त्यांच्या आदर्शाचा वारसा अखंड सुरू आहे. त्या अनुषंगाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या संस्था व व्यक्तींचा सन्मान करण्याबरोबरच यंदाच्या वर्षापासून स्व. जनार्दन भगत साहेबांच्या नावाने स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तालुकास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली. तालुक्यातील ग्रामपंचायतींचे स्वच्छतेच्या निकषावर सर्वेक्षण करण्यात आले.  या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानकरी शिवकर ग्रामपंचायत ठरली. त्यांना एक लाख रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक कुंडेवहाळ ग्रामपंचायत 50 हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक सावळे ग्रामपंचायत 25 हजार रुपये व सन्मानचिन्ह तर उत्तेजनार्थ वलप आणि चिंध्रण या दोन ग्रामपंचायती ठरल्या असून त्यांना प्रत्येकी 11 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा रोख रक्कम व पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये भारत सरकारतर्फे स्वच्छ शाळा सन्मानित रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर, ए+ ग्रेड प्राप्त व ऑटोनॉमस उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून राज्यस्तरीय 14वा आणि देशपातळीवर 28वा क्रमांक पटकाविणारे सीकेटी स्वायत्त कॉलेज, राज्यस्तरीय स्वच्छता पुरस्कार पटकावणारे भागुबाई चांगू ठाकूर विद्यालय द्रोणागिरी, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष (पुरस्कार स्वरुप 51 हजार रुपये), गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड जलतरणपटू प्रभात कोळी (पुरस्कार स्वरुप 51 हजार रुपये), शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पनवेल, प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली (राजपथ) येथे परेड करण्यासाठी निवड झालेले ओमकार कैलास देशमुख व प्रांजली दिलीप चव्हाण (पुरस्कार स्वरुप प्रत्येकी 11 हजार रुपये), चित्रकार गिरीश पाटील (पुरस्कार स्वरुप 51 हजार रुपये), सईशा मंगेश राऊत यंगेस्ट इंडियन गर्ल टू स्केल माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प (पुरस्कार स्वरुप 25 हजार रुपये), राष्ट्रीय सांस्कृतिक स्पर्धेत रजत पदक पटकाविणारे श्रीश किरण म्हात्रे आणि विशाल अरुणा तायडे आदींचा सन्मान करण्यात येणार आहे.

उलवे नोड येथील सेक्टर 16 एमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे होणार्‍या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे असणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, खजिनदार भाऊशेठ पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, सदस्य अनिल भगत, प्रकाश भगत, संजय पाटील, संजय भगत, वसंत पाटील, हरिश्चंद्र पाटील आदींची उपस्थिती असणार आहे.

Check Also

दिघाटीत आमदार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त दिघाटी येथील महायुतीच्या प्रचार रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या वेळी …

Leave a Reply