पनवेल ः वार्ताहर
पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत चिंचपाडा सेक्टर आर 3 येथील काळभैरव मंदिरातील कडी कोयंडा तोडून मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे व दानपेटीमधील रक्कम चोरी झाल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला आहे.
मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास आत प्रवेश करून मंदिरामध्ये असलेल्या तीन दानपेट्यांमधील रोख रक्कम तसेच परिसरातील सहा सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिलीप शिंदे (प्रशासन), प्रमोद पवार (गुन्हे), उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, हवालदार रवींद्र राऊत, परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, पोना विनोद देशमुख, रवींद्र पारधी, शिपाई प्रसाद घरत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या आधारे माहिती घेतली.
आरोपी रोहित साळुंखे (रा. कामोठे गाव) व मारुती केंद्रे (रा. छोटा खांदा) यांच्याबाबत माहिती मिळाल्याने दोन आरोपींना सापळा रचून पनवेल परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper