माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल येथील जय मल्हार मित्र मंडळाच्या वतीने किड्स समर कॅम्पचे मोफत आयोजन करण्यात आले होते. हा कॅम्प शहराच्या मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील गणेश मंदिरात 5 ते 7 मेदरम्यान उत्साहात झाला. या ठिकाणी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी (दि. 7) भेट देत बक्षीस वितरण केले. या कॅम्पमध्ये क्राफ्ट, पेंटिंग, डान्स, अॅक्टिंग वर्कशॉप तसेच योगा याबाबत मुलांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यास मुलांनी प्रतिसाद देत आनंद लुटला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष मयुर खिस्मतराव, टीडब्ल्यूटीच्या अस्टिस्टंट मॅनेजर दिप्ती खिस्मतराव, सायली पराडकर, दिपश्री खेडकर, प्रदीप शहा, मंडळाचे उपाध्यक्ष शेखर मंजुळे, सचिव गणेश मंजुळे, खजिनदार हितेश चौधरी, सदस्य नितीन तांबोळी, मनीष शहा, किरण चंदने, आदित्य डिंगोरकर, अमित जगनाडे, रवी चंदने, कुणाल नसरे, अभिषेक खिस्मतराव, शिवराज साखरे, प्रतिक चौधरी, मनोर परदेशी आदी उपस्थित होते.