Breaking News

ख्रिसमस व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर दक्ष राहण्याचे पोलिसांकडून आवाहन

उरण ः वार्ताहर

ख्रिसमस आणि नव वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्ष राहावे त्याचबरोबर पर्यटकांबाबात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्यांना सर्व सेवा सुविधा मिळाव्यात त्याचप्रमाणे देशावर घोंगावत असलेल्या परकीय देशविघातक शक्तींच्या पार्श्वभूमीवर घारापुरीत कोणताही अनर्थ घडू नये यासाठी पोलिसांबरोबरच नागरिकांनीही सतर्क राहावे असे आवाहन सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांनी केले आहे.

 जागतिक कीर्तीच्या घारापुरी येथे ख्रिसमस व वर्षं अखेरच्या सुट्टीच्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटक या  येत असतात. अशा पर्यटकांच्या वेशात कुणी देशविघातक शक्ती देखील या ठिकाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच या काळात येणार्‍या पर्यटकांमध्ये कोणी संशयित तर नाही ना यावर पोलीस लक्ष ठेऊन असणार आहेतच मायर नागरिकांनी देखील दक्ष रहावे असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे. या ठिकाणी येणार्‍या देशी विदेशी पर्यटकांना सुविधा व सुरक्षा देन्याच्या हेतुने वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिंदे सागरी पोलीस ठाणे मोरा यांचे अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.

या वेळी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर, उपसरपंच सचिन म्हात्रे, सदस्या मीना भोईर, तसेच लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील, तंटा मुक्त कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वर भोईर, हॉटेल व्यवसायीक तसेच इतर प्रतिनिधी तसेच  वनविभाग, भारतीय पुरातन विभाग, मेरीटाईम बोर्ड, एमटीडीसी, तहसिल कार्यालय आदी विभागांतील अधिकारी उपस्थित होते. सर्वांनी दक्ष राहून येणार्‍या सणावारांच्या काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply