Sunday , September 24 2023

पनवेल महापालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांची माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना वेग आला असून विविध कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांची महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 15) अधिकार्‍यांसह पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या.
मान्सूनपूर्व कामांमधील अनेक मार्गी लागली असून काही कामे सुरू आहेत. या कामांची माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कळंबोली सेक्टर 7, 8, 10,
खारघरमधील सेक्टर 20,19,16,12,7,6,8 आणि कोपरा गावात पाहणी करून आढावा घेतला.
या पाहणी दौर्‍यावेळी माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, बबन मुकादम, अमर पाटील, रामजी बेरा, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, राजू शर्मा, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, मोनिका महानवर, प्रमिला पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली शहर अध्यक्ष राविनाथ पाटील, समीर कदम, वासुदेव पाटील, किरण पाटील, गीता चौधरी, साधना पवार, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी, प्रवीण बेरा, रमेश खडकर, गजय सिंग, वॉर्ड अधिकारी जितू मढवी, स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

मलेरिया, डेंग्यू रोखण्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज

आमदार प्रशांत ठाकूर यांचे पनवेल मनपाच्या बैठकीत आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात …

Leave a Reply