पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर-तळोजा भाजप युवा मोर्चाच्या वतीने युवा वॉरियर्स हॉलीबॉल चषक स्पर्धेचे आयोजन खारघर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पोस्टरचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अनावरण झाले.
या वेळी खारघरचा राजा चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष विजय म्हात्रे, युवा मोर्चा खारघर तळोजा मंडळ अध्यक्ष विनोद घरत, नितेश अभिमन्यू पाटील, अक्षय लोखंडे, अतुल पाटील, रवी म्हात्रे, रितीक पाटील आदी उपस्थित होते. ही स्पर्धा 20 मे रोजी खारघर सेक्टर 12 येथील गोखले शाळेच्या मैदानात होणार आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …