Breaking News

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत ‘सीकेटी’चे विद्यार्थी चमकले

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सन 19-20 मध्ये घेण्यात येणारी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ती परीक्षा 23 जानेवारी 2021 रोजी झाली. या परीक्षेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी चांगलीच बाजी मारली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता आठवी, नववी व दहावी या इयत्तांकरिता ही परिक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा तालुकास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात येतो. या वर्षीच्या परिक्षेला बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रशस्तीपत्रक मिळाले असून एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला नाही.

आदित्य आनंद कुलकर्णी (इयत्ता आठवी), याला राज्यस्तरीय 32 व्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून विशेष पारितोषिक यश पांडव, समृध्दी पुरोहित (इयत्ता आठवी), आदिती पाटील (इयत्ता दहावी) या विद्यार्थ्यांना मिळाले आहे.

तालुकास्तरीय पारितोषिक अनन्या झा, शुभदा देशमुख, शाश्वत प्रभू (इयत्ता दहावी), प्रज्ञान खंडागळे (इयत्ता नववी) अवधूत घरत आणि सिध्दी म्हस्कर (इयत्ता दहावी) या सहा विद्यार्थ्यांना मिळाले.

अथर्व खडतर, सिध्दी भोसले (इयत्ता दहावी), चेतन चौधरी, साशा वायंगणकर (इयत्ता नववी), मंथन रोडे, ईशा तारेकर (इयत्ता दहावी) या सहा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच इतर 29 विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक प्राप्त झाले आहे.

सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

कोरोना काळातही शाळेने या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन मार्गदर्शक वर्ग घेतले होते. विद्यार्थ्यांनीही मनापासून अभ्यास करून शैक्षणिक गुणवत्ता राखण्याचे काम केले. याकरिता मी मार्गदर्शक शिक्षकांचे आणि पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन करतो.

-संतोष चव्हाण, मुख्याध्यापक

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply