Breaking News

45वी कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्राचे दोन्ही संघ जाहीर

मुंबई : प्रतिनिधी

कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात 15 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या 45व्या कुमार-कमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने आपले दोन्ही संघ जाहीर केले. कोल्हापूरच्या सौरभ पाटीलकडे कुमार गट संघाचे; तर मुंबई शहरच्या साक्षी रहाटेकडे कुमारी गट संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले.

मुलांच्या संघाचा सराव मुंबईतील संघटनेच्या कार्यालयात; तर मुलींचा सराव पनवेल येथे सुरू होता. मुलांच्या संघात कोल्हापूर, पुणे, ठाणे यांचे प्रत्येकी दोन खेळाडू आणि मुंबई, उपनगर, पालघर, परभणी, रत्नागिरी, बीड यांचा प्रत्येकी एक खेळाडू निवडला गेला आहे. मुलींच्या संघात मुंबई शहर, सातारा यांचे प्रत्येकी दोन खेळाडू आणि रायगड, अहमदनगर, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, ठाणे, उपनगर, परभणी यांचा प्रत्येकी एक खेळाडू निवडला गेला आहे. अंतिम 12-12 खेळाडूंची यादी राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने उपाध्यक्ष शकुंतला खटावकर (अर्जुन पुरस्कारप्राप्त) यांनी प्रसार माध्यमांकरिता जाहीर केली. हा संघ गुरुवारी (दि. 13) पहाटे गीतांजली एक्स्प्रेसने स्पर्धेकरिता रवाना झाला.

कुमार गट संघ : सौरभ पाटील (संघनायक),  तेजस पाटील (दोघे कोल्हापूर), अस्लम इनामदार, राजू कथोरे (दोघे ठाणे), राहुल सवर (पालघर), पंकज मोहिते, भरत करंगुटकर (दोघे मुंबई उपनगर), तन्मय चव्हाण, शुभम शेळके (दोघे पुणे), ओंकार कुंभार (रत्नागिरी), युवराज शिंदे (परभणी), वैभव गर्जे (बीड). प्रशिक्षक : आयुब पठाण (नांदेड), व्यवस्थापक : लक्ष्मण गावंड (रायगड), निवड समिती : राजू माने (कोल्हापूर), भरत धनले (परभणी), जितेंश जोशी (ठाणे), आयुब पठाण (नांदेड).

कुमारी गट संघ : साक्षी रहाटे (संघनायिका), प्रतीक्षा तांडेल, काजल खैरे (तिघी मुंबई शहर) तेजा सपकाळ (रायगड), सोनाली हेळवी, वैष्णवी खळदकर (दोघी सातारा), जया राऊत (अहमदनगर), मृणाली टोणपे (कोल्हापूर), दिव्या सपकाळ (रत्नागिरी), राधा मोरे (पुणे) लक्ष्मी गायकवाड (ठाणे), कोमल लगोटे (परभणी), प्रशिक्षिका : वीणा शेलटकर-खवळे (मुंबई उपनगर), व्यवस्थापिका : सारिका जगताप (नाशिक), निवड समिती : सायराबानू शेख (सातारा), वीणा शेलटकर (मुंबई उपनगर), सारिका जगताप (नाशिक) व दुर्वा वेल्हाळ (रत्नागिरी).

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply