पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्राचे दानशूर व लाडके व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शुक्रवारी (दि. 2) न्हावेखाडी रामबाग येथे जल्लोष सुवर्णयुगाचा हा कार्यक्रम सादर झाला.
न्हावेखाडी ग्रामस्थ मंडळ आणि श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच स्टेप आर्ट डान्स अकॅडमी प्रस्तुत व पप्पू सूर्यराव निर्मित जल्लोष सुवर्णयुगाचा हा कार्यक्रम झाला.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …