Friday , September 22 2023

पनवेल तालुक्यात महायुतीच्या प्रचाराचा धडाका

नेरे विभागात महायुतीच्या प्रचाराला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ अनेक ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील नेरे पाडा येथे गुरुवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ नेरे पाडा येथे प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, रमेश पाटील, पंचायत समिती सदस्य राज पाटील, भुपेंद्र पाटील, विश्वजीत पाटील, प्रकाश घाडगे, धनंजय पाटील, बबन पाटील, शशिकांत भगत, शंकर भगत, सुधिर फडके, गजानन पाटील, भरत पाटील, वसंत फडकेे, गुरुनाथ भोपी, नारायण पाटील, आलाध पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply