Friday , September 29 2023
Breaking News

आकुर्लीच्या उपसरपंचपदी भाजपचे नितीन धरणेकर

पनवेल : रामप्रहर वृत्त

आकुर्ली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पार्टीचे नितीन सत्यवान धरणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नितीन धरणेकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

पनवेल तालुक्यातील आकुर्ली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक सोमवारी (दि. 12) झाली. या निडवणुकीत भाजपचे नितीन सत्यवान धरणेकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.

या वेळी भाजप ज्येष्ठ नेते सदाशेठ पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, माजी सरपंच सचिन पाटील, सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, आकुर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती पाटील, सदस्य ग्रामपंचायत सदस्या जयश्री पाटील, उत्कर्षां भोपी, नम्रता म्हसकर, गंगा म्हात्रे, अंकिता पाटील, वासंती नाईक, ग्रामपंचायत सदस्य मछिंद्र पाटील, उमेश भोपी, रघुनाथ जाधव, जयेंद्र पाटील, हरिचंद्र जोशी, कचरू काथारा, नितीन भोपी, संदीप पाटील, विलास म्हसकर, काळुराम म्हसकर, अनंता भोपी आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply