पेण : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले, तसेच विनामूल्य धान्य देण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर राज्य शासनानेही पुढाकार घेऊन जनतेला रोख रक्कम स्वरूपात मदत करावी, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी केली आहे.
आमदार पाटील म्हणाले की, कोरोना संकट आपल्या देशातही आले, तर त्यापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाने रायगडकरांवर अस्मानी संकट ओढवले. त्यामुळे लोक हतबल झाले आहेत. ते पाहता राज्य शासनाने पुढाकार घेऊन रोख स्वरूपात मदत करणे आवश्यक असून, या रकमेतून लोक दैनंदिन जीवनात आवश्यक असणार्या वस्तू खरेदी करू शकतील तसेच इतर प्रश्न सोडवू शकतील, परंतु राज्य शासन कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने नागरिकांपर्यंत मदत पोहोचणेही मुश्किल झाले आहे. पेण तालुक्यातील जनता अजूनही मदतीपासून वंचित आहे. जनतेच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper