Breaking News

…म्हणून भारताच्या पदरी पराभव! ; युवराज सिंगने मांडले अत्यंत परखड मत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने संघ व्यवस्थापनाला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले आहे. विश्वचषकात उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. संपूर्ण स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोणी करायची यावर अनेक चर्चा घडत राहिल्या, मात्र एकाही फलंदाजाला या जागेवर आश्वासक कामगिरी करता आली नाही. संघ व्यवस्थापन चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीच्या समस्येवर उपाय शोधण्यात कमी पडल्यामुळेच भारताच्या पदरी निराशा आली. चौथ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज शोधण्यात संघ व्यवस्थापन पूर्णपणे अपयशी ठरले. चौथ्या क्रमांकासाठी अनेक पर्याय तपासून पाहण्यात आले, मात्र एकाही खेळाडूला संघ व्यवस्थापनाने आपला पाठिंबा दिला नसल्याचे युवराजने बोलून दाखवले.चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज खेळायला येणार हे शोधणे गरजेचे होते. विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर आपल्या फलंदाजांनी काढलेल्या सर्वोत्तम धावा म्हणजे फलंदाजीत चौथ्या क्रमांकाची जागा ही महत्त्वाची असते हे कर्णधार, प्रशिक्षकाला माहिती असायला हवे. इंग्लंडमध्ये चेंडू हवेमध्ये प्रचंड वळतो. अशा वेळी चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज हवाच. चौथ्या क्रमांकावरचा फलंदाज तांत्रिकदृष्ट्या सक्षम असावा. विजय शंकर-ऋषभ पंत काही सामने खेळले, मात्र त्यांच्याकडे पुरेसा अनुभव नाही. दिनेश कार्तिकसारख्या अनुभवी खेळाडूला साखळी सामन्यांमध्ये संघाबाहेर बसवण्यात आले आणि अचानक उपांत्य सामन्यात त्याला संधी देण्यात आली. संघ व्यवस्थापन नेमके काय करीत होते? माझ्या मते विश्वचषकातील पराभवाचे हे सर्वांत मोठे कारण आहे, अशा शब्दांत युवराजने आपले परखड मत मांडले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply