आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले अभिनंदन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाचे नेते मन्सूर पटेल यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख व मुंबई अध्यक्ष वसीम खान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या नियुक्तीबद्दल मन्सूर पटेल यांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तसेच तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची मंगळवारी (दि. 24)सदिच्छा भेट घेतली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह पदाधिकार्यांनी पटेल यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, ज्येष्ठ कार्यकर्ते गुलजार पटेल, अल्पसंख्याक मोर्चाचे रायगड जिल्हा सरचिटणीस अॅड. इर्शाद शेख, उपाध्यक्ष नासिर नुरा शेख, तालुका अध्यक्ष मोसीन कर्नाळकर, शहर अध्यक्ष निसार सय्यद, माजी अध्यक्ष इम्तियाज बेग, दानिश बेग, पत्रकार वसीम पटेल, सउद शेख आदी उपस्थित होते.