Breaking News

महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

रोहे ः प्रतिनिधी

भारतीय उद्योजकता विकास संस्था व टाटा कम्युनिकेशन लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा येथे एक महिना कालावधीचा महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम शुक्रवारी (दि. 12) तक्षशीला बौद्धविहार, रोहा येथे झाला

प्रमाणपत्र वितरणास रोहा अष्टमी नगर परिषद नगरसेविका नेहा आंबरे, पूर्वा मोहिते, पंचायत समिती विस्तार अधिकारी अशोक दांडेकर, प्रशासकीय अधिकारी संजय कवितके, बौद्ध समाज युवा संघ संस्थापक रमेश शिंदे, साईश्रद्धा फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय राणे आदी उपस्थित होते.

या वेळी महिला प्रशिक्षणार्थींनी एक महिना प्रशिक्षण घेऊन यापुढे आर्थिक स्वावलंबनाकरिता यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रांत नक्कीच भरारी घेऊ, असे विचार मांडले. त्याचबरोबर विस्तार अधिकारी अशोक दांडेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात शासनदरबारी यापुढे कोणतीही मदत लागल्यास आपण आम्हाला केव्हाही संपर्क करा. आम्ही आपल्या मदतीसाठी तत्पर असू, असे आश्वासन दिले. रमेश शिंदे यांनी आपल्या मनोगतात अनेक महिला अनेक प्रशिक्षण शिबिरात बसतात, परंतु प्रत्यक्ष व्यवसायात उतरत नाहीत. तुमची बॅच ही भविष्यात घेण्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या शिबिरातील महिलांना एक आदर्श ठरेल असे काम करून एक यशस्वी उद्योजक बनाल अशा शुभेच्छा देत असल्याचे सांगितले.

नगरसेविका स्नेहा आंबरे मॅडम यांनी सुरुवातीच्या दिवशीची उपस्थिती व आज प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांची उपस्थिती पाहून प्रशिक्षक शशिकांत दानोरिकर यांच्या जिद्दीचे कौतुक करण्याबरोबरच महिलांना कोणतीही अडचण आल्यास आपण मला संपर्क करावा. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी मी तयार असेन. अशा मदतीच्या हाकेबरोबरच आता महिलांनी चूल व मूल या जोखडाबाहेर येऊन आत्मनिर्भर व आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्याकरिता व्यवसायात उतरावे, असे आवाहन केले. विजय राणे यांनी आज आपला समारोप नसून आजपासून खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. कारण उद्यापासून प्रत्येक महिलेने आपले ध्येय गाठण्यासाठी सुरुवात करायची आहे. यासाठी आम्ही आपल्या सतत संपर्कात राहणार आहोत. याशिवाय बँक लोनसंदर्भातही आम्ही सर्व प्रकारची मदत करू, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक तसेच मान्यवरांचे आभार भारतीय उद्योजकता विकास संस्थानचे प्रकल्प अधिकारी शशिकांत दानोरिकर यांनी मानले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply