पनवेल : रामप्रहर वृत्त
येथील चहावाले रवींद्र मगर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला होता. पनवेलचा चहावाला दिल्लीच्या गौरवास पात्र झाल्याबद्दल भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मगर यांचा शुक्रवारी (दि. 30) येथे सत्कार केला.
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळील पदपथावरील चहाविक्रेते रवींद्र काशिनाथ मगर यांनी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत कर्ज घेऊन त्याची परतफेड व्यवस्थितरित्या केली. गेली 35 वर्षे चहा विक्रीचा व्यवसाय करणार्या मगर यांचा नुकताच केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयातर्फे दिल्लीत विज्ञान भवन येथे सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष भेट देत आणि चर्चा करून मगर यांचा सन्मान केला. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी मगर यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. या सर्व बाबतीत आलेला अनुभव कथन करताना मगर यांनी माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना असल्याचे नमूद करून गेल्या 50 वर्षांत केंद्रातून असा सामान्य माणसाचा सन्मान कुणीच केला नसल्याचे अधोरेखित केले तसेच आपण खूप भारावून गेलो, असेही सांगितले.
देशाचे लोकप्रिय कार्यतत्पर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पनवेलच्या चहावाल्याची भेट ही पनवेलकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. यापुढेही अशीच प्रगती करीत रहा आणि कधीही काहीही गरज लागल्यास आवर्जून हाक द्या, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी रवींद्र मगर यांचा ’मोदी 20’ हे मराठी अनुवादीत पुस्तक देऊन सत्कार करताना म्हटले. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे, अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, माजी नगरसेवक विकास घरत तसेच वृषभ मगर उपस्थित होते.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …