नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान क्रिकेट संदर्भात काही मोठे निर्णय तालिबानने घेतले आहेत. अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू आणि संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतली की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. ताज्या अपडेटनुसार अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मॅच होणार असल्याचे तालिबानने जाहीर केलेय.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या काळात होबार्ट येथे एकमेव कसोटी मॅच खेळणार आहे.