Breaking News

उरणमध्ये कोविड लसीकरण पुन्हा सुरू

उरण : वार्ताहर

उरणमध्ये लसींचा साठा संपल्यामूळे बंद झालेले लसीकरण पुन्हा सुरू झाल आहे. उरण मध्ये 600 कोविशिल्ड व 100 कोवॅक्सिनचा साठा उपलब्ध आहे, तर तो साठा संपत आल्यास दररोज आलिबागमधून आणण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याची इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांनी सांगितलेे. गेले दोन ते तीन दिवस कोरोना लसींचे डोस संपल्याने उरणमधील उरणमध्ये ग्रामीण आरोग्य केंद्र कोप्रोली व इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय या दोन ठिकाणी चालू असलेले लसीकरण थांबले होते. त्याचबरोबर उरणमध्ये वाढत आसलेले कोरोना रुग्ण यामुळे नागरिकांमध्ये अनामिक भीती पसरली होती, परंतु मंगळवारी (दि. 13) उरणमध्ये कोरोनावरील लसींचे डोस उपलब्ध झाल्याने पुन्हा लसीकरणास सुरूवात झाली आहे. उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण आरोग्य केंद्र कोप्रोली येथे कोविशिल्डचे 500 डोस उपलब्ध झाले आहेत, तर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांनी सांगितले की, येथे 100 डोस कोविशिल्डचे व 100 डोस कोवॅक्सिनचे आहेत व जसे संपतील तसे दररोज ते आणण्याची व्यवस्थाही केली आहे.

ग्रामीण आरोग्य केंद्र कोप्रोली येथे लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय व्यवस्थेवर ताण वाढत आहे. हे टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅपवर लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करावे व नंतर यावे. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही व वैद्यकीय व्यवस्थेवर पण ताण पडणार नाही.

-डॉ. राजेंद्र इटकरे, उरण तालुका आरोग्य अधिकारी

Check Also

परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …

Leave a Reply